भविष्यात भारत आणि नेपाळ यांच्यासह संपूर्ण पृथ्वीवर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित करण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन ! – नागेश गाडे

0
528
Google search engine
Google search engine

सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चा उत्साहात प्रारंभ !

रामनाथी (गोवा) –

हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्रीनागेश गाडे यांनी अधिवेशनाचा उद्देश अवगत करतांना सांगितले कीजगात ख्रिस्ती समुदायाची152, इस्लामी 57, बौद्धांची 12 राष्ट्रेतर ज्यूंचे ‘इस्रायल’ नावाचे एक राष्ट्र आहेहिंदूंचे मात्र या पृथ्वीवर एकही राष्ट्र नाहीवैश्‍विक पटलावर आगामी वर्षांत भारत आणि नेपाळ ही दोन हिंदु राष्ट्र पुनर्स्थापित व्हावीतया उद्देशाचे विचारमंथन व्हावे आणि हिंदु संघटनांचे योजनाबद्ध रितीने या दिशेने मार्गक्रमण व्हावेहाच या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहेहिंदु राष्ट्रस्थापना केवळ भारतापुरती मर्यादित नसून वेदमंत्रात म्हटल्याप्रमाणे ‘संपूर्ण पृथ्वी ही एक राष्ट्र आहे’या समुद्रवलयांकित पृथ्वीवर भविष्यात हिंदु राष्ट्र स्थापित करायचे आहे.

       अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रारंभी शंखनाद करण्यात आलादीपप्रज्वलनानंतर सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी वेदमंत्रांचे पठण केलेत्यानंतर उपस्थित संतांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा !’ या मराठी आणि हिंदी भाषांतीलतसेच सनातनच्या ‘स्वभावदोष(षड्रिपुनिर्मूलनाचे महत्त्व आणि गुणसंवर्धन प्रक्रिया’ या मराठी आणि हिंदी भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आलेया वेळी श्रीप्रदीप खेमका यांनी हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉजयंत आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्रीसुमीत सागवेकर यांनी केले.