लँड १८५७ हा चित्रपट ८ जून रोजी प्रदर्शित.

0
1033
Google search engine
Google search engine
अनिल चौधरी, पुणे-

काम करताना एके काळी जाणवत असलेली कलाकारां मधील जेष्ठ आणि कनिष्ठ ही दरी आज नष्ट झालेली दिसते आणि हा सकारात्मक बदल मनाला समाधान देणारा आहे. – जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर.

 

पुण्यातील विजयालक्ष्मी जाधव यांनी “लँड १८५७” या त्यांच्या पहिल्याच  मराठी भाषिक चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट ८ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे त्या निमित्याने  जाधव यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया च्या सभागृहात चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रसार माध्यमे यांच्यातील बातचीतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अनिल नगरकर, विठ्ठल काळे, मानिनी दूर्गे, इतर कलाकार, तंत्रज्ञ, फिल्म अँड टेलिविजन इन्स्टिट्युट चे डॉ. चंद्रशेखर जोशी आणि  मराठी चित्रपट महा-मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले उपस्थित होते. या वेळी कलाकारांनी चित्रीकरणाच्या  वेळी आलेले अनुभव,  काही रंजक किस्से ऐकवले.

 

 

जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर म्हणाले “पूर्वी काम करताना निर्मात्या कडून कलाकारांना त्यांची  कारकीर्द पाहून वागणूक दिली जायची. त्या मुळे समान गुणवत्ता असून ही कुठे तरी जेष्ठ आणि कनिष्ठ अशी दरी असायची. आजच्या काळात निर्मात्या कडून दिल्या जाणाऱ्या समान वागणूकी मुळे ही दरी नष्ट झाली  आहे आणि हा सकारात्मक बदल मनाला समाधान देणारा आहे”. चित्रपट महा-मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी महा-मंडळाच्या काम काजा विषयी सांगितले. ते म्हणाले की “काही समस्या किंवा अडथळे आल्या नंतर महा मंडळा कडे धाव घेण्या पेक्षा प्रत्येक निर्मात्या ने महा-मंडळाच्या सम्पर्कात सुरवाती पासुनच रहायला हवे”. छोटे मोठे असे चार हजाराहून अधिक चित्रपट निर्माते आपल्या महाराष्ट्रात आहेत पण महा मंडळाच्या कामा  विषयी माहिती आणि जागृकता फार कमी निर्मात्यां मध्ये आढळून येते अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. चित्रपट निर्मात्या विजयालक्ष्मी जाधव आपल्या पहिल्या वाहिल्या चित्रपट निर्मिती बद्धल बोलताना म्हणाल्या, ”कले वर निस्सीम प्रेम असणाऱ्या कलाकारांना मानधन किंवा चित्रीकरण दरम्यान दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा या बाबत तक्रार नसते. आपली भूमिका चोख पार पाडण्याला हे कलाकार प्राधान्य देतात आणि माझ्या पहिल्याच चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी मला असे कलेवर प्रेम करणारे सर्व कलाकार, तंत्रज्ञ लाभले. चित्रीकरण कोल्हापूर मध्ये पार पडले त्या वेळी सुद्धा तिथल्या स्थानिक कलाकार आणि रहिवाशांनी खूप सहकार्य केले.