नेपाळसह भारतातही ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देऊ ! – डॉ. माधव भट्टराई, अध्यक्ष, राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ, काठमांडू, नेपाळ

0
733
Google search engine
Google search engine

 

भारतातील तत्कालीन काँग्रेस शासन आणि ‘युरोपियन युनियन’च्या दबावाखाली वर्ष 2016 मध्ये राजतंत्र विसर्जित करून ‘धर्मनिरपेक्ष’ संविधान अमलात आणले गेले. नेपाळच्या संसदेत आज दोन तृतीयांश पेक्षाही अधिक प्रतिनिधी हे कम्युनिस्ट आणि माओवादी आहेत. नेपाळमध्ये केवळ एक टक्का ख्रिस्ती धर्मीय असून तेच आज संपूर्ण नेपाळवर राज्य करत आहेत. आज ख्रिस्त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि अन्य सेवांच्या माध्यमांतून नेपाळमध्ये पाश्‍चात्त्य विकृतींचा प्रभाव चालू केला आहे. या परिस्थितीतही आम्ही नेपाळसह भारतातही हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देऊ, असे प्रतिपादन काठमांडू (नेपाळ) येथील ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’चे अध्यक्ष आणि नेपाळचे राजगुरु डॉ. माधव भट्टराई यांनी ‘नेपाळची वर्तमान स्थिती, संघटित झालेले विविध हिंदू आणि नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्याचे प्रयत्न’ या विषयावर बोलतांना केले.