संसदरत्न पुरस्कारांचं आज चेन्नईत वितरण – सात पैकी पाच खासदार महाराष्ट्रातील

0
603
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या नवव्या संसदरत्न पुरस्कारांचं आज चेन्नई येथे वितरण होणार आहे. एकूण सात खासदारांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, त्यापैकी पाच खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. त्यात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, हिंगोलीचे खासदार श्री राजीव जी सातव, मावळचे खासदार श्री श्रीरंग बारणे, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि नंदुरबार च्या खासदार हिना गावित यांचा यामध्ये समावेश आहे.