राजधानीत महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी

0
729
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली -:

शूर योध्दा महाराणा प्रताप सिंह यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.