पोलिस सेवेत कर्तव्य बजावत विधी पदवी मिळवणाऱ्या एपिआय शुभांगी दिवेकर ह्यांचा सत्कार

0
1090
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतीनिधी :-

अकोट शहर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर( कोरडे) ह्यांचा विधी पदवीधर झाल्या बद्दल आज (दि.१७) पोलिस स्टेशन अकोट शहर येथे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .ह्या वेळी बोलतांना पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले की सौ शुभांगी दिवेकर ह्या पोलिस स्टेशन अकोट शहर सारख्या संवेदनशील पोलिस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे तपास पथक प्रभारी म्हणून कार्यरत असतांना, तसेच एका चिमुरडीची आई, सून व पत्नी म्हणून जबाबदारी असतांनाही त्यांनी मिळवलेले यश निश्चितच वाखाणण्याजोगे आहे, त्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल अकोट शहर पोलिस स्टेशन च्या प्रत्येक अधिकारी ,कर्मचारी ह्यांना सार्थ अभिमान आहे, ह्या सत्काराप्रसंगी शहर पोलिस स्टेशन मधील पो.उपनिरीक्षक शरद माळी ,महेंद्र गवई यांच्यासह सर्व अधीकारी उपस्थित होते.