श्री रविंद्र धोतरकर यांना मातृशोक

0
778
Google search engine
Google search engine

अकोट,(प्रतिनीधी ) –

येथे आयडीबीआय बँकेचे रोखपाल रविंद्र धोतरकर यांच्या मातोश्री वै.श्रीमती सुशिला मनोहर धोतरकर (वय ७०) यांचे गुरुवार (ता.१४) ला सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थीवावर, सायंकाळी हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

वै.सुशिला धोतरकर ह्या स्थानिक नरसिंग कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वै.मनोहर धोतरकर यांच्या पत्नी होत्या.त्यांचे पतिंचे गत वर्षी २८ जूनला निधन झाले होते.त्यांचे वर्षश्राध्द होण्याच्या आतच धोतरकर कुटूंबियांवर दुःखाचा हा डोंगर कोसळला.वै.सुशिला ह्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या.त्या शहरातील धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात सहभागी व्हायच्या.त्यांच्या मागे मुलगा,सुन,नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.अंत्यसंस्कारानंतर शहरातील असंख्य नागरिकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.