RPF कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनयभंग

0
842
Google search engine
Google search engine

कल्याण : आरपीएफ जवानानेच महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडला आहे. हा प्रकार एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून अन्य प्रवाशांनी या जवानाला चोपही दिला. मात्र संतापाची बाब म्हणजे हा प्रकार घडला, तेव्हा हा जवान झोपेत असल्याची सारवासारव आरपीएफने केली. या जवानाला पाठीशी घालण्याचा पुरेपूर प्रयत्न सध्या केला जातो आहे. राजेश जहांगिड असे या विनयभंग करणाऱ्या सीआरपीएफचे नाव आहे.