जनता दल (से.) च्या जिल्हाध्यक्षपदी गौरव सव्वालाखे यांची निवड कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

0
977

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

     जनता दल (सेक्युलर) च्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी गौरव सुधाकरराव सव्वालाखे यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली आहे.

      जनता दल (सेक्युलर) ची महाराष्ट्र कार्यकारीणीची बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, प्रधान महासचिव प्रतापराव होगाडे, कार्याध्यक्ष अॅड. रेवन भोसले, युवा प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, विदर्भ प्रमुख डॉ. विलास सुरकर आदींची उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान ठराव घेऊन अमरावती जिल्हाध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये गौरव सुधाकरराव सव्वालाखे यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी करून नियुक्तीपत्र प्रदान केले. गौरव चांदूर रेल्वे मतदार संघातील माजी आमदार स्व. सुधाकरराव सव्वालाखे यांचे सुपुत्र आहे. अमरावती जिल्ह्यासाठी प्रथमच युवा जिल्हाध्यक्षाची निवड झाल्यामुळे जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांचे अनेक स्वप्न अपुर्ण राहिले असून ते पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहो व जबाबदारीच्या माध्यमातुन जनता दल पक्षाचे ध्येय, धोरण, भुमिका व कार्य सर्व वर्गात पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे गौरव सव्वालाखे यांनी सांगितले.

       गौरव सव्वालाखे यांच्या निवडीबद्दल डॉ. क्रांतिसागर पांडुरंग ढोले, मेहमुद हुसैन, संजय डगवार, अॅड. सुनिता भगत, धर्मराज वरघट, शोभा मुनकर, शंकरराव आंबटकर, दादाराव डोंगरे, सुधिर सव्वालाखे, विनोद गोठाने, मोहन खंडारे, मंदा पाचकवडे, महादेवराव शेंद्रे, भिमराव खलाटे, बबनराव मोहोड, रामचंद्र हटवार, छायाताई झाडे, साहेबराव शेळके, गोरख नाखले, अंबादास हरणे, प्रकाश बन्सोड, रमेश गुल्हाणे, अशोक हांडे, राजु बद्रे, अवधुत सोनवने, डॉ. अजमिरे, प्रमोद बिजवे, जनार्दन पडधान, अशोक रोडगे, देविदास शेबे, दिपक भगत, डॉ. उत्तमराव पडोळे, सुनिल हुमने, रमेश कुबडे, देवराव सगळे, संजय वरटकर, कुमोद मेश्राम, गजानन शहाडे, रामकृष्ण पडधन यांसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.