नाशिक जवळ शिरवाडे फाटा या ठिकाणी बस आणि क्रुझरचा अपघातात – ५ ठार तर ६ गंभीर जखमी

0
1366
Google search engine
Google search engine
उत्तम गीते :- 
नाशिक महामार्गावर जवळ असलेल्या शिरवाडे फाटा या ठिकाणी बस आणि क्रुझरचा अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत अशी माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचारसुरु आहेत. पिंपळगाव चांदवड जवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही दिशेची वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. क्रूझर गाडी बागलाण तालुक्यातील किकवारी येथील होती यामध्ये बसलेले सगळे जण एका लग्नासाठी जात असताना त्याचवेळी हा अपघात झाला.
चांदवडच्या खडकजांब गावाच्या शिवारातील क्रुझर मुंबई आग्रा महामार्गाने नाशिकच्या दिशेने जात होती. तेव्हा क्रुझरचे टायर फुटले. टायर फुटल्यावर ही गाडी दुभाजक ओलांडून नाशिकहून येणाऱ्या सटाणा आगाराच्या बस क्रमांक एम एच १४ बी टी ४७१६ ला धडकली. या धडकेत क्रुझरमध्ये बसलेल्या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर अपघातामुळे ६ जण जखमी झाले आहे. अपघातानंतर या ठिकाणी लोकांची गर्दीजमा झाली होती. तसेच काही वेळ रस्त्याच्यादोन्ही दिशेने वाहतूक कोंडी ही झालेली होती.