जेंव्हा पोलिस निरीक्षक स्वच्छता मोहीम राबवितात.!!

0
1222
Google search engine
Google search engine
सांगली/कडेगांव/हेमंत व्यास- 
स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत मोहीम महाराष्ट्र शासन व भारत सरकार ची सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे.भारताचे पंतप्रधानांनी २आॅक्टोंबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान जाहीर केले.एक नागरीक म्हणून स्वच्छतेचे महत्व,फायदे आपल्या जीवनात कोणीही नाकारू शकत नाही.असाच एक स्वच्छता मोहीम उपक्रम कडेगांव पोलिस ठाण्यात कडेगांव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.एस.पुजारी साहेब व  सर्व पोलिस राबवित आहेत.दर मंगळवारी स्वत: पोलिस निरीक्षक पुजारी साहेब  परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अग्रेसर असतात असतात.त्यामुले पोलिस सही सहभागी होतात.एकुणच कडेगांव पोलिस ठाणे परिसर एकदम चकाचक दिसत आहे.स्वच्छते विषयी बोलताना कडेगांव पोलिस निरीक्षक के.एस.पुजारी साहेब म्हणाले की, आरोग्य हेच धन अशी म्हण प्रचलित आहे पण आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकृत असणे गरजेचे असते यापैकी महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छता.आरोग्य हे पैशापेक्षा मौल्यवान आहे.गमावलेले पैसे कमावता येवु शकतात पण आरोग्य परत मिळवणे महा कठीण असते.आपल्याकडे अनेक आजार हे निव्वल अस्वच्छतेमुले होतात.त्यामुले घरातील व परीसरातील स्वच्छता हे उत्तम आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.आमचे पोलिस कर्मचारी निरोगी राहण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा स्वच्छता मोहीम राबवित असतात.पोलिस स्टेशनच्या या स्वच्छता मोहीमेला कडेगांवच्या जनतेचा सलाम!!