दिघी कोल्हे येथे जुगार अड्ड्यावर धाड – मारुती कार, मोटार सायकल, मोबाईलसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0
1063
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – 
 तालुक्यातील दिघी कोल्हे येथील प्रसिद्ध जुगार अड्ड्यावर ठाणेदार शेळके यांच्या नेतृत्वात २५ जूनच्या सायंकाळी धाड टाकुन ६ मोबाईल, मारुती ओमनी, दोन मोटारसायकली, जुगाराचे साहित्य व अडीच हजार रोख असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.  यामध्ये अमृत तुकाराम पाटील, मारोती तुकाराम पाटील दोघे रा. दिघी कोल्हे व गोकुळ सिताराम कवटकर यांना अटक केली आहे. तर सदर प्रकरणात ८ आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून त्यामध्ये रमेश आत्माराम ढोक, शिवाजी सिताराम खोब्रागडे, मधुकर उत्तम वासनिक, विनोद पंजाबराव देवताळे, राहुल एकनाथ मेश्राम, देशमुख, रफिक, राजू यांचा समावेश असल्याची माहिती ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांनी दिली. आरोपींवर जुगार प्रतिबंधक १२ (अ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.