बिशपने लैंगिक शोषण केले ! – केरळमधील ननचा आरोप

0
855
Google search engine
Google search engine

 

कोट्टायम (केरळ) – केरळमधील एका चर्चच्या ५ पाद्य्रांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप नुकताच झाला असतांना आता राज्यातील एका ननने उत्तर भारतातील ‘डायोसीस’च्या कॅथोलिक बिशपवर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ‘या बिशपने ४ वर्षांपूर्वी अनेकदा लैंगिक शोषण केले होते’, अशी तक्रार त्या ननने पोलिसांकडे केली आहे.

कोट्टायम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ननने केलेल्या तक्रारीत तिने म्हटले आहे की, बिशपने तिचे १३ वेळा लैंगिक शोषण केले. वर्ष २०१४ मध्ये कोट्टायम जिल्ह्यातील कुरावलंगद भागातील एका अनाथालयाच्या जवळ असणार्‍या अतिथी गृहामध्ये तिचे पहिल्यांदा लैंगिक शोषण करण्यात आले. याविषयी चर्चच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती; मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. बिशपच्या विरोधात पोलिसांत तक्रार केल्यामुळे चर्च तिच्यावर अप्रसन्न आहे.

या तक्रारीविषयी बिशप यांनी म्हटले आहे की, ननचे स्थानांतर करण्यामुळे ती माझा सूड घेत आहे. बिशप यांनीही पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस दोन्ही तक्रारींवर अन्वेषण करत आहेत. सदर बिशप वर्ष २०१३ मध्ये उत्तर भारतातील चर्चमध्ये होता.