ज्ञानबा तुकाराम च्या गजरात – जगतगुरू तुकोबांचे पंढरीकडे प्रस्थान

0
905
Google search engine
Google search engine

 

देहू: आषाढी एकादशीकरिता संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूनगरीतून पंढरीकडे प्रस्थान केले आहे. ३३३व्या पालखी सोहळ्यात राज्यभरातील वारकरी आणि देहूकर सहभागी झाले असून इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळा भरल्याचा भास होत आहे.  या सोहळ्यासाठी पालकमंत्री श्री गिरिश बापट, खासदार श्रीरंग बारणे,अमर साबळे,  देवस्थानचे अध्यक्ष श्रीमान पंढरीनाथ मोरे, सोहळा प्रमुख अशोक निवृत्ती मोरे,आदी उपस्थित आहेत. यावेळी श्री बापट यांनी बारणे यांच्यासोबत फुगडी खेळली.