अहेरी बस आगार परिसरात नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न..!!

0
868
Google search engine
Google search engine

अहेरी :-

13 कोटी वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत अहेरी बस आगार तर्फे दरवर्षी प्रमाणे आज अहेरी आगार(डेपो) परिसरात अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, ह्यावेळी अहेरी बस आगार व स्थानक परिसरात S.T. कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारच्या 50 वृक्षांची लागवड केली..!!

ह्यावेळी बस आगार प्रमुख युवराज राठोड, नगर पंचायत उपाध्यक्ष कमलताई पडगेलवार, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, माजी नगराध्यक्ष प्राजक्ताताई पेद्दापल्लीवार, उपाध्यक्ष अन्नपूर्णाताई सिडाम, अहेरी बस स्थानक नियंत्रक जितेंद्र राजवैद्य,भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष शंकर मगडीवार, वामन चिप्पा, दिलीप पडगेलवार, दिनेश येणगँठीवार सह S.T. कर्मचारी व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती..!