कृषी उत्पन्न बाजार समिती अवैध जनावर वाहतूक मध्ये 3 आरोपी याना अटक,अटक केलेल्या ची संख्या 25 च्या घरात,

0
1435
Google search engine
Google search engine

त्या 94 गौवंश यांचा वाली कोण,कृषी उत्पन्न बाजार समिती अनभिज्ञ, पोलीस स्टेशन याना मागितले मार्गदर्शन.

चांदुर बाजार:-

अवैध पणे होत असलेल्या गौवंश जनावर वाहतूक प्रकरणात चांदुर बाजार पोलिसांच्या तपास यंत्रणेमुळे आणखी 3 आरोपी याना अटक करण्यात आले आहे.सिद्धर्थ जयदेव जोशी,रामेश्वर नामदेव कोसरे, रा दोन्ही घाटलाडकी,अनिल पूडलिक जफुलकर रा.बेलमडली येथून याना त्याच्या राहत्या घरून गुप्त माहिती च्या आधारे अटक करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश मधून गौवंश पायदळ आणून त्यांची पोहचती बाजार समिती पर्यंत करण्याची जबाबदारी हे तिघे जण पार पाडत होते.जनावर पायदळ आणत असल्याने यांच्यावर कोणी शक सुद्धा करत होते.मात्र पोलिसांच्या तपास यांचा शोध लागला.तसेच आता पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कर्मचारी आणि संचालक याना अटक करण्यात आली आहे तर काही संचालक यांची चौकशीसुरू आहे. त्यामुळे आता हे प्रकरण तपासत असल्याने आणखी या मधील आरोपी यांची संख्या वाढणार असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.
तर या तिघांना अटक ठाणेदार अजय आकरे,सहायक पोलिस निरीक्षक सलीम चव्हाण,पोलीस कॉस्टबल पंकज फाटे,शाम सोनोनेयांनी पार पाडली.

कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अवैध जनावर वाहतूक मुळे 94 गौवंश हे बाजार समिती च्या आवारात आहे.बाजार समिती यांनी या संबधी खरे मालक यांनी अर्ज करण्याचे सुध्दा सांगितले. तसेच या प्रकरणात या 94 गौवंश यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती ने स्थानिक पोलिस स्टेशन ला मार्गदर्शन मागितले आहे.अजून पर्यत पोलिसांकडून या बाबत कोणतेच मार्गदर्शन मिळाले नसल्याची माहिती आहे.त्यामुळे ते 94 गौवंश यांचा वाली कोण?त्यांचे काय होणार अशी चर्चा आहे.