शिवसेने तर्फे वारकऱ्यांना फराळ आणि पाणी वाटप

0
986
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी , पुणे

दिंड्यांदिंड्यां मधून होणारा विठूनामाचा घोष….. अन् टाळ- मृदुंगांचा झंकार … अशा अत्यंत भारावलेल्या वातावारणात  कैवल्यसाम्राज्य  चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत  तुकाराम महाराजांच्या पालखीचा चा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता. पुणे करांच्या आदरतिथ्याने भारावलेला  हा सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. जड अंत:करणानेच पुणेकरांनी पालखी सोहळ्यांना निरोप दिला. भैरोवनाला येथे शिवसेना पुणे शहर, कोंढवा खुर्द ग्रामस्थ, मा.आ.महादेव बाबर , मा.नगरसेवक भरत आप्पा चौधरी व शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाल्ख्यातील वारकऱ्यांना फराळ व पाणी वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.

      “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या  गजरात आज संपूर्ण पुणे शहर भक्ती भावाने नाहून निघाले होते. पुणे करांचा पाहुणचार घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी आज पुण्याहून प्रामुख्याने पंढरपूर कडे प्रस्थान केले.  “माऊली” “माऊली” च्या जयघोषात आज दोन्ही पालखी  यवतच्या दिशेने व सासवड मुक्कामी निघाल्या.

      शिवसेना  शाखा , कोंढवा खुर्द ग्रामस्थ , मा.आ.महादेव बाबर व मा.नगरसेवक भरत चौधरी यांच्या वतीने आज पुणे सोलापूर रोड येथील भैरोबानाला येथे वारकऱ्यांना फराळ, पाणी चे वाटप करण्यात आले. अतिशय भक्तिभावाने आजचे वातावरण नाहून निघाले  होते.  वारकरी, पालख्यामुळे आम्हाला एक प्रकारचे नवचैतन्य मिळते असे मा. नगरसेवक भरत चौधरी हे पाणी  व फराळ वाटताना म्हणाले.

  यावेळी मा.नगरसेवक भरत चौधरी, सचिन कापरे, शंकर लोणकर, गणेश रावडे,ह.भ.प.सुनील महाराज कामठे,  नाना भाडळे, दादा भणगे,महेंद्र भाडळे, जीवन गोते,नितीन लोणकर, लक्ष्मण लोणकर,  सुनील चौधरी, ज्ञानेश्वर भोईटे, दीपक शिंदे व शिवसैनिक  महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते