अत्यंत क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद केल्याबद्दल खडक पोलिसांचा सत्कार

0
920
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे –

४ जून रोजी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत कचरू गणपत गवळी वय ३२, रा.बिबवेवाडी पुणे, ह्यांचा चाकूने वार करुन अज्ञात व्यक्तीने खुन केला होता. कुठलेही साक्षी पुरावे नसताना पोलिसांनी अत्यंत हुशारीने अहोरात्र मेहनत घेऊन बारकाईने व अत्यंत हुशारीने सतत बावीस दिवस तपास करुण अश्विन विकास गवळी वय 19, रा. आंबेगाव पठार कात्रज या तरुणास अटक केली आहे. त्यामुळे पोलिसांनी अत्यंत हुशारीने आणि चातुर्याने केलेल्या तपासास पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी खडक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांस तीस हजार रुपये व प्रशस्तीपत्र  बक्षीस देऊन त्यांचा सत्कार केला आहे.

   याबाबतची सविस्तर हकीकत अशी कि, 4 जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कचरू गणपत गवळी यांचा अज्ञात व्यक्तीने खुन केला होता. घटना पहाटे घडल्याने तेथे कोणतेही साक्षी पुरावे ,धागेदोरे पोलिसांना मिळून येत नव्हते व आरोपीचा सुगावा लागत नव्हता त्यामुळे आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांवर निर्माण झाले होते. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके करण्यात आली. पण कुठलेही उमेद न सोडता पोलिसांनी अत्यंत बारकाईने, कसोशीने तपास चालू ठेवला. सतत बावीस दिवस तपास चालू ठेवला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुण्यातील बुधवारपेठ, शुक्रवार पेठ, शिवाजीरोड, स्वारगेट,सातारारोड, बिबवेवाडी, कात्रज रोड या परिसरातील व सरकारी तसेच खागी असे ऐंशी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी यावेळी करण्यात आली. यामध्ये एक संशयित आरोपी पांढरे व काळे रंगाचे होंडा डीओ स्कुटरवरून फिरत असल्याचे व त्याचा मयात व्यक्तीशी एकेठिकाणी वाद झाल्याचे दिसून आले.

        यावेळी खडक पोलिसांनी पुणे शहर व जिल्ह्यातील होंडा डीओ कंपनीच्या सर्व डीलर कडून दोन हजार गाड्यांची माहिती संकलित करण्यात येऊन त्याद्वारे तापस सुरु केला होता. त्यामधील निवडक संशयित पांढरे व काळ्या रंगाच्या एकशे सोळा डीओ मोपेडच्या मालकांना पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी करण्यात आली.त्या तपासामध्ये संशयित अश्विन विकास गवळी याची माहिती प्राप्त झाली व त्यास अटक करण्यात आली.याबाबत पोलिसांनी त्याला खुनाचे कारण विचारले असता, मयत व्यक्तीने माझ्या डोक्यात बाटली मारल्याने त्याचा राग मनात धरून मी त्यांच्या छातीवर चाकूने वार करुन खून केल्याचे सांगितले.

     सदर तपास परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी शिर्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, आनंत व्यवहारे, कर्मचारी सतीश नागूल, विनोद जाधव, बापू शिंदे, विश्वनाथ शिंदे, संदीप कांबळे, आशिष चव्हाण, अनिकेत बाबर, समीर माळवदकर, विनोद जाधव, इम्रान नदाफ, रवींद्र लोखंडे, गणेश सातपुते, सागर घाडगे, महेश कांबळे,तानाजी सरडे, राहुल जोशी यांनी केला आहे.

  सदर तपास अत्यंत हुशारीने व शिताफीने केल्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी खडक पोलिसांचा सत्कार व बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे.

 

 

फोटो लाईन – वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी