अकोट शहर पोलिस स्टेशन येथे जननी २ मोहिमे अंतर्गत ऑटो चालकांची सभा संपन

0
775
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके -अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कला सागर ह्यांचे आदेशाने व अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकांत सागर व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनोने ह्यांचे मार्गदर्शनखाली आज 16।7।18 ला अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलिस स्टेशन अकोट शहर च्या सावली सभागृहात शहरातील अॉटो चालकांची सभा घेतली.यावेळी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांची मीटिंग घेऊन त्यांना सुरक्षीत वाहतुकी संबधाने आवश्यक त्या सूचना दिल्या व कोणत्याही परिस्थिती मध्ये शालेय विद्यार्थी ऑटोला लटकून किंवा आपले शरीर बाहेर राहील अश्या अवस्थेत प्रवास करणार नाही ह्या बाबत सूचना दिल्या तसेच एक आठवड्याच्या आत सर्व ऑटो चालकांनी खाकी ड्रेस घालणे सुरू करावे. त्या नंतर त्यांचे ऑटो चलन केल्या जातील ह्या बाबत सक्त ताकीद दिली, ऑटो वाहतुकीस अडथळा होईल असे वाहन थांबवू नये व प्रवासी लोकांशी वागणूक सौजण्याची असावी अश्या सूचना दिल्या, सुचनेचे पालन न करणाऱ्या ऑटो चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ह्या बाबत त्यांना समज देण्यात आली यावेळी जवळपास 50 ऑटो चालक हजर होते, सभेला वाहतूक कर्मचारी ठाकूर, लापूरकर, फोकमारे हजर होते