एसटीचा हिरकणी कक्ष च गायब,चांदुर बाजार बसस्थानक मध्ये हिरकणी कक्ष नाही,

0
1289
IIMAGE4U
Google search engine
Google search engine

 

महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर गैरसोय.आगार व्यवस्थापक अनभिज्ञ


चांदुर बाजार :-

तान्हुल्यांना स्तनपान देता यावे यासाठी एसटी महामंडळाने आपल्या प्रत्येक बस स्थानकात मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करणे आवश्यक असताना ही चांदुर बाजार आगार मध्ये हिरकणी कक्ष नसल्याने माता यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

तान्हुल्यांना स्तनपान देता यावे यासाठी एसटी महामंडळाने आपल्या प्रत्येक बस स्थानकात मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना केली. मात्र या चांदुर बाजार तालुक्यातील बस स्थानकात हिरकणी कक्ष च नसल्याने मातांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक मातांना बसस्थानकात असा कक्ष आहे याची माहिती नाही, तसेच एखाद्यावेळेस स्तनपान करायचे असल्याने अश्या मातांनी कोठे जावे हा प्रश्न देखील गंभीर आज.तसेच त्या ठिकाण बाबत सुरक्षिता आणून एसटीने मातांचा विश्वास संपादन करण्यासाठी या बाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. राज्य परिवहन महामंडळाकडूनही ही योजना सुरू केल्यानंतर तिच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही पावले उचलली न गेल्यामुळे हिरकणी कक्ष चांदुर बाजार बस स्थानक मधून गायब झाले आहे.

पबाळाला स्तनपान देण्यात मातांना अडचण येऊ नये, त्यांना असुरक्षित वाटू नये, यासाठी हिरकणी कक्ष ही सेवा महामंडळाने सुरू केली. मात्र चांदुर बाजार मध्ये अध्यपही त्याचा पत्ता नसल्याचे समोर आले आहे.महामंडळामार्फत या कक्षाबाहेर या योजनेची माहिती देणारा कोणताच प्रकारचा फलक लावण्यात  आला नाही आहे. त्यामुळेच  या सेवेबाबत मातांमध्ये उदासीनता आहे.

त्यामुळे हिरकणी योजना राबवण्यासाठी महामंडळाला आणखी जागरूकता करण्याची गरज आहे.

मात्र या सारख्या बिकट प्रश्नावर आगार व्यवस्थापक यांनी कधी लक्षच दिले नाही.त्यामुळे माता वर्गांना हिरकणी कक्ष म्हणजे काय याची अध्यपही माहिती नाही.तर या कडे लोकप्रतिनिधी केव्हा लक्ष देणार हेही तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे या ठिकाणी हिरकणी कक्ष व्हावे अशी मागणी आता माता वर्ग कडून होते आहे.