चांदूर रेल्वे बस आगारातील मुत्रीघराचे सांडपानी रस्त्यावर – दुर्गंधीने प्रवाशी त्रस्त, स्वच्छता अभियानाला तिलांजली

0
859
Google search engine
Google search engine
आगार व्यपस्थापकांचे दुर्लक्ष
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
    चांदूर रेल्वे एस बस आगारातील मुत्रीघरातील सांडपानी आगारातील रस्त्यावर आले असून संपुर्ण आगारात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून आगार व्यवस्थापकांवर दुर्लक्षाचा आरोप करण्यात येत आहे.
    सविस्तर माहितीनुसार, स्थानिक एसटी बस आगारात महिला व पुरूषांचे स्वतंत्र मुत्रीघर असून या मुत्रीघरातील सांडपानी पाईपलाईनव्दारे एका टाक्यात सोडण्यात येते. मात्र गेल्या १५ दिवसांपासून सदर सांडपाणी चक्क आगारातील रस्त्यावर येत आहे. पाईपलाईनमध्ये चोकअप झाल्यामुळे हे सांडपाणी बाहेर येत असल्याचे सांगण्यात आले. परंतु आगार प्रशासनाला अजुनही जाग आलेली नाही. ऐकीकडे शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यावधी रूपये खर्च करून अनेक माध्यमातून जनजागृती करण्यात येते. सर दुसरीकडे बस आगारात स्वच्छ भारत अभियानाला तिलांजली दिल्या जात आहे. सदर सांडपाण्याची पाईपलाईन व्यवस्थित करून प्रवाशांना होत असलेल्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.
स्वच्छतेवर दर महिण्याला ७० ते ८० हजार रूपये खर्च
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक एस. टी. आगारात स्वच्छतेसाठी सकाळी ३ कर्मचारी तर सायंकाळी ३ कर्मचारी व त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी १ सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली असून यावर महिण्याला ७० ते ८० हजार रूपये खर्च करण्यात येते. मात्र हा खर्च फोल ठरत असून आगारातील रस्त्यावर असे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.