आकोटात महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेचा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार   

0
948
Google search engine
Google search engine

अकोट/संतोष विणके – आकोट येथे कार्यकारी अभियंता विद्यूत महामंडळ यांना कर्मचाराच्या समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार पुकारत निवेदन देण्यात आले.हा एल्गार पुकारताच कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याचे मनकासे च्या वतीने सांगण्यात आले.सदर निवेदन प्रमोद गोमासे (अकोला जि.अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्मान वीज कामगार सेना ) यांच्या नेत्तृत्वात देण्यात आले. या प्रसंगी कामगाराच्या मासीक देयक हे कामगारांना १ -३ महीन्यापासून कामगारांना देण्यात आले नाही त्यामूळे म.न.वीज कामगार सेना यांनी सदर निवेदन कनिष्ठ अभियंता यांना देण्यात आले या प्रसंगी म.न.वि.से जि.उपाध्यक्ष सूरज वर्मा , शहरअध्यक्ष शशांक कासवे यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले. तसेच म.न.वि.से शहर सचिव किरण इंगळे ,म.न.वि.से उपाध्यक्ष शुभम देशपांडे तसेच तेजस लेंघे,प्रतिक तेलगोटे ,नंदू मोरे व इतर म.न.वि.से कार्यकर्ते उपस्थित होते.