मराठा मोर्चाच्या वतीने आज लासलगाव दिवस भर कडकडीत बंद

0
1364
Google search engine
Google search engine
नाशिक जिल्हा प्रतिनिधी :- उत्तम गिते –
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार मागणी करून व मोर्चे काढूनही मराठा समाजाला अद्याप महाराष्ट्र शासनाने आरक्षण दिले नाही त्यामुळे मराठा समाजाची महाराष्ट्र शासनाविरुद्ध प्रचंड नाराजी आहे.त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजी नगर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आंदोलनाचा इशारा देऊनही शासनाने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला आहे.त्याचे बलिदान मराठा समाजासाठी व मराठा क्रांतीच्या आंदोलनासाठी व्यर्थ होऊ जाऊ दिले नाही,मराठा आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करण्याचे आवाहन या प्रसंगी लासलगाव मराठा क्रांती मोर्चा तर्फे या प्रसंगी करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चा जलसमाधी आंदोलनात सहभागी झालेले काकासाहेब शिंदे यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेचे गांभीर्य बघता आज (सोमवार)पासूनच महाराष्ट्र बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.याच अनुषंगावर लासलगाव येथील सकल मराठा समाजातर्फे लासलगाव बंदची हाक या प्रसंगी देण्यात आली
छत्रपती शिवाजी चौक येथून मूक मोर्चा काढून मेन रोड,विंचूर रोड,कोटमगाव रोड,स्टेशन रोड मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा क्रांती मोर्चा तफे लासलगाव चे सहायक पोलीस निरीक्षक शिवकुमार पांढरे तसेच तलाठी डी के नागरे यांना निवेदन देऊन शासनाचा निषेध करण्यात आला
या वेळी लासलगाव येथील सर्व व्यावसायिकांनी स्वयंफुरतीने बंद ला शंभर टक्के प्रतिसाद दिला
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर,अँड उत्तम कदम,पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे,माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील,रवींद्र होळकर,गुणवंत होळकर,शंतनू पाटील,संतोष ब्रम्हेचा,ज्ञानेश्वर पाटील,बबनराव शिंदे,डॉ श्रीकांत आवारे,डॉ विकास चांदर,योगेश पाटील,महेश होळकर,संतोष पानगव्हाणे,दिनेश थोरात,जितुकाका काळे,विनायक न्याहारकर,हेमंत आहेर,संदीप जाधव,दत्ता पाटील,भरत होळकर व सर्व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.