कडकडीत बंद ठेऊन केला मराठा समाजाणे शासनाचा निषेध

0
1160
Google search engine
Google search engine

शेगाव :- २४/०७/२०१८ विषय….मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र मध्ये मुक मोर्चे काडून शंतातमय परिस्थिती मध्ये आरक्षणाकरिता लढणारे मर्दमराठ्यांचा बांध दीं २३/२४ रोजी तुटला
दिनांक २३ ला औरंगाबाद चा काकासाहेब शिंदे या तरुण युवकाने जलसमाधी घेऊन शासनाच्या विरोधात प्राण देऊन आपला रोष व्याक्त केला.
त्याची प्रचिती म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथेे संपूर्ण मराठा समाजाने शांतते मध्ये सकाळ पासूनच सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, वाहने बंद करून तसेच गांधी चौक येथे टायर जाळून छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशी नारे देत शासनाचा निषेद करून कडकडीत बंद ठेवला शिवाय शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शेकडो युवकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला तहसील वर जाऊन निवेदन देण्याचा प्रयत्न सुद्धा सकाळी मराठा समाजाने केला परंतु तालुक्यातील राष्ट्रपती भवन असलेले तहसील कार्यालय मध्ये तहसिलदार अनुपस्थित असल्यामुळे निवेदन न देता समाज परतला वूत्त लीहे पर्यंत गावात शांतता होती गावामध्ये पोलिसांचा तगादा बंधोबस्त आहे
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आतापर्यंत शांततेनं ५८ मुक मोर्चे निघाले आहे तरी आतापर्यंत ही शासनाची जोप उघडलेली नाही आहे काय शासन वाट पाहत आहे की अजून काही बळी जावे त्याच्या नंतरच मराठा समाजाला न्याय मिळेल का असा प्रश्न मराठा मोर्चा मधील तरुण पिढी विचारात आहे.