क्रेन कोसळून 6 कामगारांचा जागीच मृत्यू.

0
635
Google search engine
Google search engine

कर्नाटकमधील कलबुर्गी येथील एका निर्माणधीन सिमेंट कारखान्यात मोठी दुर्घटना घडली. कारखान्यात क्रेन कोसळून 6 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कर्नाटकातील सेडम तालुक्यातील ही दुर्घटना आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार हे बिहारमधील रहिवासी होते.जखमी कामगाराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, हा अपघात कोणत्या कारणांमुळे झाला आहे, याबाबतची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही.