साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९८ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी

0
1122
Google search engine
Google search engine

मुंबई प्रतिनिधी : बाळू राऊत

साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९८ वी जयंती मोठ्या उत्सवात घाटकोपर मधील चिरागनगर येथे साजरी करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामजिक न्याय आणि विशेष सहाय्य व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती अध्यक्ष दिलीप कांबळे , मधुकररावजी कांबळे राज्यमंत्री (दर्जा )उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव शाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती प्रमुख पाहुणे शालेय शिक्षण व सांस्क्रुतिक मंत्री विनोद तावडे , आमदार प्रकाश मेहता, हे होते आमदार राम कदम यांच्या पत्नी वर्षा कदम , प्रभाग क्रमांक १२९ चे कार्यसम्राट नगरसेवक सूर्यकांत गवळी हे देखील उपस्थित होते .
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून त्यांची ओळख आहे .पण त्यांनी त्याहीपुढे जाऊन एक निरक्षर असताना देखील कथा , कादंबरी आणि साहित्य , चित्रपट , पोवाडे , तमाशातील वग , गवळण , असे सर्वच प्रकार त्यांनी हाताळले स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात विविध प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या फकिरा कादंबरीला .इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक शैलीमुळे ते लोकप्रिय झाले त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली त्यांच्यावर १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!
आण्णा वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा त्यांचावर जास्त प्रभाव असल्याकारणाने ते दलित कार्याकडे वळले दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला.पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.यामध्ये त्यांनी दलित व कामगार वर्गाचे महत्व स्पष्ट केले.कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.
फक्त दिड दिवसाचा शाळेचा प्रवास.शाळेत गेले तेवढा वेळच फक्त शिक्षण झाल नाही एरवी जीवनाने जे शिकवायचं होत ते शिकवलच म्हणुन अण्णाभाऊच्या झुंजार लेखणीतुन 35 कादंब-या, 13 कथासंग्रह, 13 लोकनाट्य, 7 चित्रपटकथा, 3 नाटक, 1 शाहीरीपुस्तक, 15 पोवाडे, 8 प्रवासवर्णन एवढ प्रचंड मोठ साहित्य बाहेर आल १९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।
एक नजर आण्णांच्या जीवनावर
संपूर्ण नाव : तुकाराम भाऊराव साठे
वडिलांचे नाव : भाऊराव साठे
आईचे नाव : वालुबाई साठे
लग्न : आण्णानी दोन लग्न केली पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे
अपत्य : मधुकर, शांता आणि शकुंतला.
साठेंचे नाव अनेक गोष्टींना देण्यात आले आहे.
अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ १ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹४ टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभा साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे