चांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर – विहिरीची पातळी खोल गेल्याने खरीप पिकाच्या स्थितीवर गंभीर परिणाम

0
1043
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
       परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने व उन्हाच्या प्रखरतेमुळे खरीप पिकांना जबर फटका बसण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
      मागील वर्षी २६४.४८ मि.मि. पाऊस झाला असून यावर्षी २३ जुलै पर्यंत ४०५.६६ मि. मि. पाऊस झाला आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त असले तरी अजुनही अर्धेअधिक गावात अत्यल्प पाऊस पडला आहे. सध्या पिकांची स्थिती समाधानकारक असून पावसाची आज तरी नितांत गरज असल्याची चर्चा शेतकरी वर्गात आहे. कापूस पिकापेक्षा सोयाबीन बियाणे खरिपात अधिक आहे. पावसाने दडी मारल्याने शेती भावतील नदी, नाले, कोरडे झाले आणि शेतातील विहिरीची पाण्याची पातळी खाली गेली आहे. जून व जुलै महिन्यात ठराविक दिवशी पावसाचे प्रमाण असले तरी विहीरीच्या पाण्याची पातळी वाढू शकली नाही. पावसाचे प्रमाण कमी असल्याने व कडक उन्हामुळे संत्रा बहाराच्या मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना समोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. आंबिया बहाराच्या फळांची गळती अधिक आहे.
       या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली नाही तर शेतात असलेले हिरवे दिसणारे पीक सुकण्याच्या मार्गावर राहील याची चिंता शेतकरी वर्ग करीत आहे. ४२६५१ हेक्टर भौगोलिक जमिनीपैकी ३९९०१.६५ मध्ये पेरणी झाली आहे . त्यापैकी सोयाबीन २५२६५.०९ हेक्टर पेरणी झाली आहे. तुर ७०५० हेक्टर, कापूस ६६६८ हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे. कापूस, तूर, सोयाबीन पिकांना सद्यास पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाऊस अजुन लांबला तर हे तिन्ही पिकाचे जबर नुकसान शेतकऱ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.