आज महाराष्ट्र बंदची हाक अमरावती ,पुणे, औरंगाबादेत शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

0
920
Google search engine
Google search engine

अमरावती :-

आतापर्यंत ५८ मोर्चे शांततेत काढूनही राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. आज, ९ ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. नवी मुंबई, ठाणे वगळता संपूर्ण राज्यभर बंद पाळण्यात येईल, असे सकल मराठाचे समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदमुळे आज पुणे, अमरावती ,औरंगाबादेतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी करण्यात आली आहे. दादर शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, काही मुस्लिम समाजातील नेत्यांचाही मराठा समाजाच्या बंदला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.अमरावती येथे काल वाहन फेरीचे शहरातून आयोजन करण्यात आले होते