वर्तमान ‘धर्मनिरपेक्ष’ लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदूंचे कल्याण अशक्य ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

0
784
Google search engine
Google search engine

कोसीकलान (उत्तरप्रदेश) येथे हिंदूसंघटन बैठक

कोसीकलान (उत्तरप्रदेश) – राजकीय परिवर्तन किंवा कोण्या एखाद्या राजकीय पक्षाचे सरकार यांमुळे हिंदु समाजाचे कल्याण आणि रक्षण होणार नाही. विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाहीची रचनाच मूळ हिंदुविरोधी आणि अल्पसंख्यांकप्रेमी आहे. भारतीय राज्यघटनेद्वारे अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या राज्यव्यवस्थेत योगी किंवा मोदी असे कोणी हिंदु नेते जिंकून आले, तरी ते हिंदूंचे कल्याण करू शकत नाहीत. हिंदूंचे कल्याण होण्यासाठी हिंदूंना ‘धर्मनिरपेक्ष’ लोकशाही नको, तर धर्माधारित हिंदु राष्ट्रच हवे आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे ‘दिनदयाळ उपाध्याय स्मृती मंचा’द्वारे आयोजित हिंदूसंघटन बैठकीत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांनी करून दिला. या बैठकीनंतर प्रत्येक १५ दिवसांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्‍चित करण्यात आले.