वॉटरकप स्पर्धेत नरखेड तालुक्यातील उमठा गावाचा  डंका – पानी फाउंडेशन तर्फे २० लाख रुपये व शासनाकडून १० लाख रुपये रोख बक्षीस प्राप्त !

0
1114
Google search engine
Google search engine

७५ तालुक्यामध्ये पटकाविला तिसरा क्रमांक !

नरखेड तालुका/ प्रतिनिधी /

पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये नरखेड तालुक्यातील उमठा गावाने राज्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे तर तालुकास्तरावर गायमुख गावाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यात नरखेड तालुक्यातील उमठा गावाने माणवतेचा डंका वाजवला आहे.

नरखेड तालुक्यातील उमठा या गावाने वॉटरकप स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावून रोख ३० लाखांचे पारितोषिक पटकावले असून पुणे येथील बालेवाडी स्टेडियमवरील पारितोषिक वितरणानंतर उमठा ग्रामस्थांनी गावामध्ये आनंद व्यक्‍त केला. दरम्यान, पुणे येथे पाणी फाउंडेशन चे संस्थापक आमिर खान ,किरण राव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जल संधारण मंत्री राम शिंदे , अजित पवार , राधाकृष्ण विखे पाटील , अशोकराव चव्हाण , राज ठाकरे ,सत्यजित भटकळ, डॉ.अविनाश पोळ यांच्या उपस्थितीत उमठा ग्रामस्थांनी पारितोषिक स्वीकारले.

एप्रिल व मे महिन्यात ऐन उन्हाच्या तडाख्यात कामाचे योग्य नियोजन करून ग्रामस्थ, युवक, महिलांची मोट बांधून सलग 45 दिवस राबून उमठा गाव परिसरातील शिवाराचे चित्रच पालटून टाकले. पारितोषिक मिळेल अथवा न मिळेल पण गावाचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी हजारो हात एकत्रित येऊन कामाला लागले होते. त्यामुळे काम करताना अनेक अडचणी येऊनही अगदी नेटाने ग्रामस्थांनी काम पूर्ण केले. यादरम्यान सिनेअभिनेते अमिरखान, किरणराव, व विविध सेलीब्रिटींनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांचा हुरूप वाढविला.

उमठा येथील ग्रामस्थांनी शेततळी, सिमेंट बंधारे, सिसिटी , डीप सिसिटी , एलबीएस , वनतळे , कंपार्टमेंट बंडिंगची कामे केली तसेच उमठा गावच्या परिसरातील क्षेत्रामध्ये यासारखी विविध कामे पूर्ण केले. यामुळे उमठा गावामध्ये कोट्यवधी लिटर पाणी जमा होणार आहे. याचा फायदा उमठा गावाला मोठ्या प्रमाणात होणार आहे .

पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा आज १२ ऑगस्ट रोजी पुण्यात बालेवाडी येथे वॉटर कप बक्षीस वितरण समारंभ दिमाखदार सोहळ्यात पार पडला.

स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील उमठा गावाने राज्यात वॉटर कप स्पर्धे मध्ये तिसरा क्रमांक मिळवला. तर तालुका स्तरीय नरखेड तालुक्यातील गायमुख पांढरी या छोट्याशा गावाने प्रथम क्रमांक मिळवला त्यावेळी पुणेवयेथें आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी उमठा , गायमुख पांढरी , बरड पवनी , थातूरवाडा , खलालगोंदी , बानोरचंद्र , शेमडा येथील शेकडो गावकरी मंडळी तसेच पानी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , अतुल तायडे यांनी पुणे येथील बालेवाडी येथे आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला .

वॉटर कप स्पर्धा – ३ ही ७५ तालुक्यांत आयोजित करण्यात आली होती.विजेत्यांना ७५ लाख, ५० लाख व ४० लाख अशी राज्यस्तरीय तर १० लाखांचे तालुकास्तरीय बक्षीस दिले आहे. शासनातर्फे तालुकास्तरीय पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे बक्षिसे दिले जाणार असून राज्ययस्तरीय क्रमाकांनाही शासनाच्या वतीने बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेत नरखेड तालुक्यातील 32 गावांनी सहभागी होऊन चांगले काम केले आहे.