*अ.भा.ग्रा. पत्रकार संघटनेतर्फे चिरोडी वन पर्यटन स्थळावर वृक्षारोपण- निसर्गरम्य वातावरणात पत्रकार युसुफ खान यांचा वाढदिवस साजरा*

0
864
Google search engine
Google search engine

*वनविभागाचे मोलाचे सहकार्य*

*चांदूर रेल्वे – (सुरज देवहाते)*

वृक्षारोपण करण्यासाठी शासनातर्फे विविध माध्यमातुन जनजागृती करण्यात येते. पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या सामान्य माणसालाच पर्यावरणाच्या ऱ्हासाचा अधिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येत असतांना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेतर्फे चिरोडी येथील वनविभागाच्या वनपर्यटन स्थळ येथे पत्रकार संघटनेचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य युसुफ खान यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्य ५४ झाडांचे वृक्षारोपण आज बुधवारी सकाळी ९ वाजता करण्यात आले.

या कार्यक्रमाकरीता पत्रकार संघटनेला वनविभाग, चांदूर रेल्वे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यानंतर याच वन परिसरात निसर्गरम्य वातावरणात केक कापुन वाढदिवस सुध्दा साजरा करण्यात आला. यावेळी चांदूर रेल्वे येथील सर्व पत्रकार बंधु, वनविभागाचे अधिकारी – कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.