लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

0
1074
Google search engine
Google search engine

नाशिक:- उत्तम गिते

लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित तिन्ही विद्या शाखेतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात आला.भारतीय संस्कृती प्रमाणे पाहुण्यांचे औंक्षण करुन लेझिम , झांजर व ढोल पथकाने आपल्या कलाकृतीने उपस्थितीतांची मन जिंकली.कै.लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाच्या प्रास्तविकात विद्यालयाच्या प्राचार्या अनिता अहिरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.प्रमुख पाहुण्या सुनिताताई गुजराथी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.एन सी सी च्या विद्यार्थ्यांचे संचलन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या विज्ञान छंद मंडळा कडून औषधी वनस्पती , कापडी व कागदी पिशव्या आणि रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले. जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केशरचना व वेशभूषा यातून सांस्कृतिक दर्शन घडविले.त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी साळवे या विद्यार्थिनीचे ‘नवप्रेरणा’ या स्वरचित काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.सुनिताताईनी मनोगतातून अभ्यासाबरोबर आरोग्याचा मंत्र देऊन विद्यार्थ्यांना केळीचे वाटप केले.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,सचिव संजय पाटील,सिताराम जगताप,लक्ष्मण मापारी,शंतनू पाटील,कैलास ठोंबरे,निता पाटील,संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील,डॉ.सुरेश दरेकर,डॉ.महाले,जनार्दन जगताप,प्रकाश गांगुर्डे,कदम सर,पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कौतिक आवारे तर आभार जिजामाता प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिस काझी यांनी मानले.