सनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे !

0
788
Google search engine
Google search engine

 

पुणे – डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर पुरोगामी गोतावळ्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सनातन संस्था यांच्याकडे अंगुलीनिर्देश करून अन्वेषणाची दिशा भरकटवली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्ध्या घंट्याच्या आतच उजव्या विचारसरणीच्या लोकांनी ती हत्या केल्याचे वक्तव्य केले होते. पृथ्वीराज चव्हाण आणि पुरोगामी गोतवळा यांनी दाभोलकरांच्या हत्यांची दिशा भरकटवल्यानेच खरे मारेकरी मोकाट आहेत. हिंदुत्वनिष्ठांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानेच त्यांना तोंड दाखवायला जागा न उरल्याने ते सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. राष्ट्र आणि धर्म यांवर गरळ ओकणारे पक्ष, संघटना यांच्यावर बंदीची मागणी केली जात नाही; मात्र धर्मनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदीची मागणी केली जाते, हे आश्‍चर्यजनक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. सनातनच्या समर्थनार्थ २१ ऑगस्टला येथे काढण्यात आलेल्या मोर्च्यामध्ये ते बोलत होते. येथील महाराणा प्रताप उद्यानापासून प्रारंभ झालेल्या या मोर्च्याची श्री कसबा गणपती मंदिर येथे सांगता करण्यात आली.