साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक कष्टकर्‍यांच्या व्यथा साहित्यातून मांडल्या- शैलेंद्र पोटभरे

0
1209
Google search engine
Google search engine
बीड परळी: नितीन ढाकणे, दिपक गित्ते 
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक कष्टकर्‍यांच्या व्यथा मांडण्याचे अनमोल असे काम त्याकाळी अण्णाभाऊ साठे यांनी केले. एक-एक दगड जमा केला तर भिंत तयार होते आणि एक-एक माणूस जोडला तर समाज तयार होतो असे परिवर्तनवादी विचार अण्णाभाऊ साठे यांनी आपणांस दिले. या विचारांचे अनुयायी होऊन आपण जंयतीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन केले पाहिजे असे विधान युवा रिपाइं एकतावादीचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र पोटभरे यांनी परळी तालुक्यातील सफदराबाद गोवर्धन येथे अयोजित केलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.