औरंगाबाद विभागातील १५ उपजिल्हाधिकारी आणि ४४ तहसीलदारांच्या बदल्या

0
1094
Google search engine
Google search engine

औरंगाबाद विभागातील १५ उपजिल्हाधिकारी आणि ४४ तहसीलदारांच्या बदल्या

बीड: नितीन ढाकणे

औरंगाबाद विभागात गुरुवारी मोठे फेरबदल करण्यात आले. विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील १५ तर तहसीलदार संवर्गातील ४४ अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. यात बीड जिल्ह्यातील पाच तहसीलदारांची बदली झाली असून तीन उपजिल्हाधिकारी पदावरील तीन नवीन अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत.

बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची हिंगोली येथे निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागेवर आता रवींद्र परळीकर हे बीडला येतील. परळीकर यापूर्वी औरंगाबाद येथे विशेष भूसंपादन अधिकारी (कृष्ण खोरे) पदावर होते. बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने हे निलंगा येथे गेले असून त्यांच्या जागेवर कंधार येथून येणारे प्रभोदय मुळे रुजू होणार आहेत. तर बीड विशेष भूसंपादन अधिकारी येथे अहिरराव हे रुजू न झाल्याने के.ए. तडवी यांची तिथे नियुक्ती झाली आहे.

तहसीलदार संवर्गातही बीड जिल्ह्यात मोठे फेरबदल झाले आहेत. केजचे तहसीलदार अविनाश कांबळे यांची लातूर तहसीलदारपदी तर लातूरचे तहसीलदार संजय वारकड यांची केज तहसीलदारपदी बदली झाली आहे. आष्टीचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांची सिल्लोडला तर सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी एच टी झिरवाळ यांची आष्टीला बदली झाली आहे. धारूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम परतूर येथे गेले असून त्यांच्या जागेवर बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य विभागचे तहसीलदार एस.व्ही. पवार हे धारूरला येणार आहेत.गेवराईचे तहसीलदार संजय पवार यांची उमरगा येथे तर परभणीचे सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी सखाराम मांडावडगे यांची गेवराईला नियुक्ती झाली आहे.

बीड महसूलच्या तहसीलदार मनीषा तेलभाते या परभणी येथे महसूल सहा. पदी नियुक्त होणार असून त्यांच्या जागेवर कळमनुरी येथून येणाऱ्या प्रतिभा गोरे रुजू होणार आहेत.