पत्रकार संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करा- अचलपूर पत्रकार संघटनेचि मागणी

0
769
Google search engine
Google search engine

अचलपुर / मो अज़हरुद्दिन-

अमरावती येथील लाइव्ह कार्यक्रमादरम्यान टीव्ही ९ चे पत्रकार सुरेंद्र आकोडे तसेच राहुल झोरी यांच्यावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा अचलपूर परतवाडा मराठी पत्रकार संघटनेतर्फे आज निषेध नोंदवीण्यात आला .

दि.२५ ऑगस्ट रोजी अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहामध्ये टीव्ही ९ मराठी चे पत्रकार राहुल झोरी व सुरेंद्र आकोडे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुकी करत मारण्याचा प्रयत्न केला . यामध्ये सुरेंद्र आकोडे यांना रुग्णालयात दाखल केले होते . तेव्हा शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांचेवर गुन्हे दाखल केले मात्र उर्वरित आणखी काही संशयितांना ताबळतोब अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज अचलपूर परतवाडा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तसेच तालुक्यातील इतर पत्रकारांनी निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी व्ही राठोड यांना निवेदन सादर केले आहे.
लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणारे पत्रकार हे जनता व प्रशासनातील एक दुवा आहे. अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करतात परंतु पत्रकारांवरच महाराष्ट्रात दिवसेंदिवस हल्ले होत असल्याने आता शासनाने यावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे असे या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला सांगितले आहे . यावेळी अचलपूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ईरशाद अहमद परतवाड्याचे अध्यक्ष हरिष खुजे , अचलपूर संपर्क प्रमुख आशिष गवई , प्रसिद्धी प्रमुख मोहम्मद अझरुद्दीन , पत्रकार संजय जोशी, प्रकाश गुळसुंदरे पंकज साबू ,सदस्य फिरोज खान मोईन चव्हाण , राज ईंगळे, जितेंद्र रोडे, नरेंद्र जावरे भारत थोरात ,ललित कांबळे राजेंद्र शर्मा, संजय अग्रवाल ,मनीष जहांगीरदार , मोनू सुळे , मंदार भारतीय ,शाम गुप्ता , नितेश किल्लेदार ,सचिन वानखडे आधी पत्रकारांनी निषेध व्यक्त केला .