रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीकृष्णजन्माष्टमीचा सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा

0
1083
Google search engine
Google search engine

रामनाथी, फोंडा (गोवा) – येथील सनातनच्या आश्रमात श्रावण कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी श्रीकृष्णजन्माष्टमीचा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. सनातनच्या साधक पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. चैतन्य दीक्षित आणि वेदमूर्ती श्री. सिद्धेश करंदीकर यांनी रात्री १२ वाजता बाळकृष्णाच्या मूर्तीची भावपूर्णरित्या षोडशोपचार पूजा केली. या वेळी आश्रमातील साधक उपस्थित होते.

जन्माष्टमीच्या पूर्ण दिवसभर आश्रमातील वातावरण गोकुळातील वातावरणाप्रमाणे आनंदी आणि उत्साही बनले होते. आश्रमातील अनेक साधिकांनी गोपींप्रमाणे वेशभूषा केली होती. एका साधिकेने श्रीकृष्णाचीही वेशभूषा केली होती. त्याचप्रमाणे श्रीकृष्णावर आधारित विविध भावगीतेही लावण्यात आली होती. त्यामुळे साधकांची भावजागृती होत होती.