उस्मानाबाद बस कारची धडक दोन जण गंभीर

0
1266
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – उस्मानाबादकडून वाशीच्या दिशेने जाणारी एसटी बस व स्वीफ्ट डिझायर कारची समोरासमोर धडक बसली कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत . ही घटना सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशीजवळ सोनेगाव चौकात बुधवारी ता ५ रोजी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार, येरमाळा येथून हैद्राबादच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्वीफट डिझायर कारची क्र.( टी एस ०८ ई एच ४५६६ व कळंब आगाराच्या उस्मानाबाद – वाशी क्र. एम एच २० बीएल ०७९२ ) बसची येडशी गावात वळत असताना सोनेगाव चौकात जोराची धडक बसली. यात कारचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे कारमधील निकी अजमेरा रा. हैदराबाद व सोबतचा एकजण या दोघांना जबर मार लागला आहे . घटनेची माहिती मिळताच उसमानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक आशिष खांडेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली पोलिस हवालदार विलास जाधव, पोलिस कर्मचारी येडशीतील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढुन १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून दिले आसून जखमींवर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आसल्याची प्राथमिक मिहीती समजली आहे