प्रात्यक्षिका सह मिळाले शिक्षकांना प्रशिक्षण अध्ययन निष्पत्ति कार्यशाळा; शिक्षकांचा सन्मान

0
888
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान )
अध्ययन निष्पत्ति वर आधारित प्रश्न निर्मिति कार्यशाळा दी 4 आणि 5 सप्टेम्बर रोजी स्थानिक गटसाधन केंद्र येथे घेण्यात आली. या वेळी डायट चे अधिव्याख्याता दीपक चांदुरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन प्रश्न निर्मिति कशी करायची याचे प्रात्यक्षिक करुण शिक्षकांच्या अनेक संकल्पना स्पष्ट केल्या. परंपरागत पाठाच्या मागे असलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यात फारसा फरक पड़त नसल्याचे देशभर झालेल्या ‘नॉस’ च्या चाचणी अहवालावरून उघड झाले आहे. त्यावरूनच डायट अमरावती च्या पुढाकाऱने तालुका पातळीवर शिक्षकांना प्रश्न निर्मिति कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले दोन टप्प्यात आयोजित या कार्यशाळेत तालुक्यातील सर्व विषय शिक्षकांना प्रश्न निर्मितीचे कौशल्य शिकविन्यात आले.
आज स्पर्धा परिक्षेचे युग आहे, त्यातील प्रश्न हे विचार करण्यास भाग पाडते परंतु परंपरागत पद्धतीने शाळेत विचारले जात असलेले प्रश्न हे पाठावर आधारित साधे सरळ असते. त्या प्रश्नाच्या आधारे विद्यार्थी गुण मिळविता येते परंतु गुणवत्ता शिद्ध करतांना भविष्यात अड़चन जाते असे मत तज्ञ मार्गदर्शक म्हणून दीपक चांदुरे यांनी प्रशिक्षणादरम्यान व्यक्त केले. या कार्यशाळेचे उद्घटनाला व समारोपिय प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे, विस्तार अधिकारी सदाशिव दाभाडे, उपस्थित होते. शिबिराला तज्ञ मार्गदर्शक म्हणून विषय साधन व्यक्ति श्रीनाथ वानखड़े, मंगेश उल्हे तर समन्वयक म्हणून विवेक राऊत, वर्षा गादे यांनी काम पाहिले, प्रशिक्षणात विशेष शिक्षक व सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते.

शिक्षकांचा केला सन्मान
5 सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त गटसाधन केंन्द्रातर्फे टेक्नोसेवी शिक्षक म्हणून कुशल व्यास यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व उपस्थित शिक्षकांचा तसेच केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ति यांचाही शिक्षण विभागतर्फ सत्कार करण्यात आला.