येवला तालुक्यातील ममदापूर येथील जिल्हा परिषद शाळेचा १३४ पट असून मागील ३ महिन्या पासून शाळेला २ शिक्षक सेवा देत आहेत

0
781
Google search engine
Google search engine

संतोष बटाव (येवला)

येवला तालुक्यातील ममदापूर येथील जिल्हा परिषद शाळेचा १३४ पट असून मागील ३ महिन्या पासून शाळेला २ शिक्षक सेवा देत आहेत शासनाच्या मान्यते नुसार (सर्व शिक्षण अभियान मुल्यांकन नियमावली अध्याय ४ आणि मुद्दा ४.2) किमान ४० विद्यार्थ्यान मागे १ शिक्षक या नुसार शाळेला किमान ४ असावेत हि नोंद घेऊन अतिरिक्त २ शिक्षक उपलब्द करून द्यावे अशी मागणी एक निवेदनाद्वारे छावा संघर्षमाथाडी संघटनेचे जिल्हा प्रमुख देविदास गुडघे यांनी केली तसेच
शाळेत शौचालाय व पिण्याच्या पाण्याची कुठलीही सुविधा नाही तेसेच शाळेची संरक्षण भिंत जागोजागी खराब झालेली असून त्यातून जुगारी मद्यपी व जनावरांचा त्रास शाळेला होतो, तसेच शाळेला एक शैक्षणिक अपात्र व्यक्ती २०० रुपये रोजाने ग्रामपंचायतीने देऊन व शाळेला कमी शिक्षक देऊन शासन आमच्या मुलांच्या शिक्षनाच गांभीर्य कमी लेखात आहे हा असंतोष जन भावनेत आहे.
तसेच ३० दिवसा अगोदर शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले होते, पण सदर निवेदनाचा कुठलीही विचार झालेला नसून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेले आहे त्यास जबाबदार कोण हा विषय लक्षात घेऊन नागरिकांनी शाळेला कुलूप लावले होते पण सदर अधिकार्यांनी तात्पुरती भूलावन करून कुलूप काढले, हे निवेदन देऊनही जर ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत दखल घेतली नाही तर शाळेला कुलूप लाऊन सदर शाळा हि पंचायत समितीत भरवण्याशिवाय नागरिकांकडे व नासिक ग्रामीण, छावा संघर्ष माथर्डी व जनरल कामगार युनियन संघटना यांच्याकडे पर्याय राहणार नाही असे देविदास गुडघे,रामनाथ कोल्हे,प्रवीण गुढघे ,निलेश जाधव,हनुमान गुडघे,उमेश जाधव,नाना मोरे ,समाधान जानराव,बाळू गोराने,दिगम्बर जाधव,बंडू गोराने,छबु ढोमसे यांनी इशारा दिला आहे. प्रतिनिधी/ संतोष बटाव येवला मो.,9850576769