युवतींसोबत राष्ट्रवादी लढायला तयार आहे – कु सक्षणा सलगर

429

युवतींनो लढायाला शिका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे-कु.सक्षणाताई सलगरअंबड जि.जालना येथे राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या वतीने भव्य मेळावा आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलतांना राष्ट्रवादी युवक काँग्रस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा *कु.सक्षणा सलगर* म्हणाल्या की, युवतींनो लढायला शिका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.युवतीनी स्वता: पुढे येऊन लढा देण्याची गरज आहे.मनामध्ये कोणतीही भिती न बाळगता हिमतीने संकटाचा समना करण्यासाठी कंबर कसा, युवतींनो ताट मानेने जगायला शिका,युवतींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत येऊन समाजीक कार्यात सहभाग घ्यावा.मुलींची छेड काढणाऱ्यांना व अश्लील भाषा करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी एकत्रीत या,स्त्री शिकली तरच संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते.त्यामुळे आजच्या युवती हया उद्याच्या इंदिरा, प्रतिभाताई पाटील आहेत,उद्याचा देश तुमच्या हाताने घडणार आहे. त्यामुळे जिददी आणि चिकाटीने यशस्वी वाटचाल करा उद्याचे भविष्य तुमच्याच हातात आहे.असे आवाहन युवती प्रदेशाध्यक्षा कुं.सक्षणाताई सलगर यांनी केले.*माजी मंत्री आ.राजेशभैय्या टोपे साहेब* यांच्यासारखा उच्चि शिक्षीत विकास प्रिय नेतृत्व जालना जिल्हयाला लाभलेले आहे.हे आपल्य भाग्य आहे.आपण सर्वजन ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून येणाऱ्या काळातही करत राहणारयावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, प्राचार्य डॉ.भागवत कटारे,जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखाताई लहाने, जिल्हा युवती अध्यक्षा कुं.योगीता चंद,घनसावंगी न.प.नगराध्यक्षा प्राजक्ता देशमुख,जि.प.सदस्या तथा महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा,नितू संजय पटेकर,पं.स.सभापती सरलाताई लहाने,मनिषाताई जंजाळ,प्रभा विष्णु गायकवाड,पुजा कल्याण सपाटे,ऍ़ड पुजा देशमुख, पं.स.सभापती मंजुषा कोल्हे, पं.स.सदस्या मनिषा काळबांडे,दमयंती कचरु मरकड,शोभा प्रभाकर रणदिवे,शेहनाजबी रहिम पठाण,साजिया शेख,पारुबाई खैरे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष कु.राधा खरपडे,उपाध्यक्ष कु.सरिता अगळे,सचिव वर्षा शिंदे जि.प.सदस्य,जयमंगल जाधव,तालुकाध्यक्ष अंबड भागुजी मैंद,युवक तालुकाध्यक्ष ऍ़ड.अमोल लहाने,संभाजी देशमुख,शहराध्यक्ष अर्जुन भोजने,गौतम ढवळे, अविनाश जाधव,शरद अडागळे, अनिल गिरे,सुदर्शन जाधव,सुमित मुजगुले,राजु राठोड आदींची उपस्थिती होती.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।