उस्मानाबाद- मोटारसाकलच्या धडकेने एक ठार

0
1047
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – दोन मोटारसायकलच्या धडकेत एकजण ठार

उस्मानाबाद- मोटार सायकलला पाठिमागून धडक दिल्याने एकजण ठार झाल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील 32 वर्षीय तरुण जागीच ठार झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार वाहनासह पसार झाला. तुळजापूर-उस्मानाबाद महामार्गावर सुर्या धाब्याजवळ मंगळवारी रात्री घडलेल्या या अपघातातील तरुण अंबेजवळगे येथील रहिवासी आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र राऊ राठोड, (वय 32, रा. अंंबेजवळगे (तांडा), ता.जि. उस्मानाबाद) हा तरुण (मंगळवार, 11 रोजी रात्री साडेआठ वाजणेच्या सुमारास दुचाकीवरून तुळजापूरकडे येत असताना सुर्या धाब्याजवळ अज्ञात दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे वाहन चालवून पाठीमागुन जोराची धडक दिली. अपघातात राजेंद्र राठोड हा जागीच ठार झाला. याबाबत मयताचा चुलत भाऊ उमेश सिद्राम राठोड याने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मनगिरे करीत आहेत