बालगोपाळांच्या श्री सर्वेश्र्वर गणेश मंडळाच्या वतिने गणेशोत्सवात सामाजिक व सांस्कृतिक विकासात भर घालणारे उपक्रम

0
810
Google search engine
Google search engine
मुकबधीर विद्यार्थ्यांना जेवण, जीवनावश्यक वस्तू भेट, परळीकरांसाठी दोन फायर रिसीव्ह सर्व्हिस उपलब्ध
 बीड : परळी: नितीन ढाकणे, दिपक गित्ते 
गणेशोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी आणि भक्तांच्या भक्तीचा महापुर, ज्या महापुरूषांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सवाची सुरूवात केली आज काही मंडळे तोच उद्देश सफल करत असल्याचे दिसून येत आहे. काही मंडळे श्रीमंत तर काही मंडळे विचारांनी श्रीमंत असल्याचे दिसून येते. परळीतील बालगोपाळांच्या माध्यमातून सर्वेश्र्वर गणेश मंडळाच्या वतिने गणेशोत्सव 2018 मध्ये असाच एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम आज गुरूवार दि.20 सप्टेंबर रोजी राबविण्यात आला. गांधी मार्केट (हालगे गल्ली), मोंढा येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आज झालेल्या कार्यक्रमात मुकबधीर विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात लागणारे जेवणाचे ताट, चमचे, ग्लास, वही, पेन देण्यात आले असून परळी शहरातील नागरिकांसाठी दोन फायर रिसीव्ह सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
याबाबत सविस्तर असे की, परळीतील मोंढा भागातील सरदारजी यांच्या घराशेजारील श्री सर्वेश्र्वर गणेश मंडळाच्या वतिने आज गुरूवार दि.20 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवामध्ये महाप्रसाद व अंध आणि अपंगांना जीवनावश्यक वस्तू भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूही भेट देण्यात आल्या. या वस्तू भेट देणे हा त्या पाठीमागचा उद्देश नसून या विद्यार्थ्यांना मायेचा ओलावा आणि प्रेम मिळावे व सामाजिक जीवनात त्यांच्या सुद्धा कुठे तरी स्थान असते ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हा उद्देश या उपक्रमाचा असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर लहान वयातील मुलांनी एकत्र येवून राबविलेला हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय आणि कौतुकास पात्र असा आहे. ज्यांना कोणाचा आधार नाही, ज्यांच्या जीवनात प्रेमाची व मायेची कमतरता आहे अशांबद्दल जिव्हाळा दाखविणे व त्यांच्या ओठावर हसू फुलविणे ही बाब नक्कीच कौतुकास पात्र आहे, असेच उपक्रम जर परळीत होत राहिले तर इथले सामाजिक आणि सांस्कृतिक बदल झपाट्याने होतील व इथला सांस्कृतिक विकास गतीने होईल असा विश्र्वास आपल्याला वाटत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, विश्र्वस्त विजयकुमार मेनकुदळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी, नगरसेवक चंदुलाल बियाणी, शिवसेनेचे जेष्ठ नेते अभयकुमार ठक्कर, न.प.शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, नगरसेवक अनिल अष्टेकर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे, वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन अशोक जैन, सामाजिक कार्यकर्ते विजयसेठ वाकेकर, अ.भा.वारकरी मंडळाचे तालुका सचिव ह.भ.प.विश्र्वास महाराज पांडे, माजी नगरसेवक जयपालसेठ लाहोटी, कुमार व्यवहारे, नागेश हालगे, पत्रकार संजय खाकरे, बबडूसेठ शर्मा, संतोष जुजगर, श्रीकांत ढेले, बाबासाहेब गंगाधरे, युवक नेते अनंत इंगळे, दत्ताभाऊ सावंत, यांच्यासह अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी व वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख व उपस्थित मान्यवरांनी यांनी बाल गोपाळांनी गणेश मंडळाच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
दरम्यान आज झालेल्या कार्यक्रमाचा सर्वच परळीतील बाल गोपाळांनी लाभ घेतला. श्रीं च्या स्थापनेपासून आज झालेल्या विशेष कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे लहान वयातील मुलांनी एकत्र येवून ही गणेशोत्सवाची आगळी वेगळी संकल्पना अस्तित्वात आणली. मोठ्यांच्या कौतुकास पात्र ठरणारे असे उपक्रम परळीत सुद्धा राबविले जातात. याबद्दल अनेकांना नवल वाटले.
*बाल गोपाळांचा विशेष उपक्रम*
दरम्यान आज गुरूवार दि.20 सप्टेंबर रोजी गांधीमार्केट (हालगे गल्ली) मोंढा भागातील बाल गोपाळांच्या श्री सर्वेश्र्वर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येवून मुकबधीर विद्यालयातील सुमारे 41 विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात लागणारे वस्तू जेवणाचे ताट, चमचे, ग्लास, पेन व वही असे साहित्य भेट स्वरूपात देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या सुरूवातीस मुकबधीर विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. तसेच याच भागातील काही दुकाने एक महिन्यापूर्वी जळून खाक झाले होते. या अनुषंगाने परळी शहरातील नागरिक, व्यापारी यांच्या मदतीसाठी या बालगोपाळांनी दोन फायर रिसीव्ह सर्व्हीस उपलब्ध केल्या असून कुठेही दुर्घटना घडली तर परळीतील नागरिकांनी 9096346516, 9665911909, 9850884764, 8855982777 या क्रमांकावर संपर्क साधून ही फायर रिसीव्ह सर्व्हीस सेवा उपलब्ध करून देण्यात येईल असे श्री सर्वेश्र्वर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.