मजरूह सुलतानपुरी पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री सुभाषचंद्र जाधव यांना प्रदान ..

0
1452
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे :-

हिंदी चित्रपटसंगीतामध्ये मजरूह सुलतानपुरीना रोमॅटिक शायर म्हणून ओळखले जाते.

रुपेरी पडदयावरील चार पिढ्यातील नायकांसाठी त्यांनी अजरामर गाणी लिहिली आहेत.

अशा महान शायर सुलतानपुरी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे या निमित्त

ज्येष्ठ सिने पत्रकार सुभाषचंद्र जाधव यांचा मजरूह सुलतानपुरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये संगीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी अतिशय सदाबहार गाणी

लिहिली आहेत. त्यांच्या इतका टिकून राहणारा एकही शायर हिंदी चित्रपटसृष्टीत अजून तरी

झाला नाही. पत्रकार सुभाष जाधव हे गेली ५० वर्षे चित्रपट विषयक लेखन करत असून

त्यांची आतापर्यंतएकूण १८ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यामध्ये मजरूह

सुलतानपुरींवर लिहिलेल्या “यहाँ के हम सिकंदर” या पुस्तकाचा समावेश आहे. या

पुस्तकाबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

हे वर्षे मजरूह सुलतानपुरींचे जन्मशताब्दी वर्षे साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने

इंडियन डेव्हलेपमेंट अँड एज्युकेशन संस्थेतर्फे मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठातील “फिरोजशाह

मेहता भवन” मध्ये दोन दिवस राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. पहिल्या

दिवशी केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मजरूह सुलतानपुरींशी संबंधित काही

मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सुभाषचंद्र जाधव

यांचा समावेश होता. जाधव गेली ५० वर्षे चित्रपटविषयक लेखन करत आहेत. या प्रसंगी

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, अॅड. माजीद

मेमन, अदलीब सुलतानपुरी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.