प्रशासनाचा कार्यकर्ते खातात मार नेते पाहतात मजा…?*

0
1480
Google search engine
Google search engine

शेगांव :- शेगांव शहरात साला दर साला प्रमाणे पारंपरिक पध्दतीने शहरातून अनेक भागातून नवरात्री उत्सव साजरा होऊन आई जगदंबेची मिरवणूक काढण्यात येते असते. यात अनेक मंडळ सहभाग घेऊन मिरवणूक पार पाडतात, या मिरवणुकीत युवकांचा जल्लोष असतो आणि प्रशासन या मिरवणुकीवर लक्ष ठेऊन असते.
नवदुर्गा उत्सव विसर्जन मिरवणूकीत पोलीस प्रशासन सतत कार्यरत असते, चोख बंदोबस्त असतो , पोलिसांचं आणि राजकीय नेत्यांच सहकार्य नागरिकांना मिळते अस साधारण पणे सर्वत्र होत असते परंतु विदर्भाची पांढरी मानल्या जाणाऱ्या शेगांव शहरात मात्र यात वेगळच काही दिसले…
*असे काय घडले*
नवदुर्गा उत्सव मिरवणूक शांततेत पार पाडाव्यात म्हणून शांतता कमिटी गठीत केल्या जाते मोठं-मोठी भाषणे दिली जाते सूचना दिल्या जातात पण सांगण्यात व प्रत्येक्षात कृती करण्यात फरक असते सर्व सुचना फक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांना साठीच असतात की काय काही कळत नाही.
तरी सुद्धा शांतता कमिटी मध्ये राजकीय मंडळी पद् घेऊन आपली व्हा व्हा करण्यात व्यस्त असतात. नवदुर्गा उत्सव विसर्जन मिरवणुकीची जैय्यत तयारी सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांकडून सुरू होते आणि एका पाठोमाघे एक मंडळ मिरवणूकीत सहभागी होतात वेळेचे बंधन असल्या मुळे सर्व मंडळ आपआपली मिरवणूक वेळेवर संपवण्याचां पुरेपूर प्रयत्न सर्व मंडळांकडून होत होते. नवदुर्गा उत्सव विसर्जन मिरवणूकीतील मंडळे जमा मज्जित अर्थात संवेदनशील भाग म्हणून घेणाऱ्या पोलीस प्रशासना कडून ज्या मंडळाच्या डोक्यावर नेत्याचा हात नाही अशांना नाहक लोटपोट केली जात होती . पोलिसांनी सहकार्य करावे, मार्गदर्शन करावे पण लोटपोट कितपत योग्य ? तसेच वाजंत्री वाहन चालकांना सुद्धा धाक धपट करून जबरदस्ती वाहने काढण्यात येत होती.
मंडळाचे कार्यकर्ते भक्तिच्या नांदत नाच करीत असताना प्रशासकीय अधिकारी त्यांना लोटपोट करीत होते मात्र प्रशासन आपला रोष अशा मंडळांवर काढत होता ज्या मंडळाला राजकीय वारसा नव्हता मध्ये जर का अशा वेळी काही कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून अपरिचित प्रकार घडला तर मग याला जबाबदार कोण प्रशासन ? अधिकारी ? नेते ? की भक्ती मध्ये मग्न असणारे कार्य करते ? पण ज्या मंडळामध्ये गावातील मुत्सद्दी नेते हजर होते म्हणजे सत्तेतील भाजप,शिवसेना,तसेच काँगेस,मनसे,भारिप,mimया पक्षचे सर्व लहान-मोठे नेते हजर होते.
यांचे मंडळ या नाहक त्रासाला अपवाद ठरले एवढ मात्र खरे… अशातच या ठिकाणी एका मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना समाजाची सुरक्षेची हमी देणाऱ्या काही निवडक पोलिस दादांनी यांना विनाकारण मारहाण केली आणि मारताना असा काही रोष होता की ते अट्टल गुन्हेगार आहेत अशा अट्टल गुन्हेगारा सारखी मारहान होत असताना जर यावेळी कुना कार्यकर्त्याचा रोष उसदनला असता तर आज शेगांव नगरीचे चित्र काही वेगळेच असते आशा वेळी स्वतःला समाजाचे हितचिंतक समजून शांतता कमिटीची पदे भूषविनाऱ्या राजकीय नेते यांना हा सर्व प्रकार दिसत असतांनाही ते काही ही बोलत नव्हते.
या वरून असे वाटते की प्रशासनाच्या नजरेत यांची प्रतिमा सिगारेटच्या राखी सारखी असावी
नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते तेथे काही ही बोलायला तयार नव्हते त्यांच्या डोळ्यासमोर प्रशासन या कार्यकर्त्यांना मनसोक्त पणे मारत होते म्हणून आम्ही या नेत्यांना सिगारेटची राख म्हणून संबोधले आहे.          *वारे नेते वा…..*
हट्टे न हट्ट पुर्ण केला अशी खमंग चर्चा कार्यकर्यांन मध्ये रंगताना दिसत आहे.

ज्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झलीत्यांची प्रतिमा कडीपत्ता सारखी असावी याच कारण अस की ज्या प्रमाणे भाजी फोडणी देण्यागोदर गरम तेलात कडीपत्ता टाकल्या जाते आणि जेवणारा हात चव घेण्या अगोदर कडीपत्त्याला बाजूला फेकून देतो आणि नंतर भाजीचा आस्वाद घेतो अशी परिस्थिती कदाचित त्या मंडल्याच्या कार्यकर्त्यांची आहे अशी गावात चर्चा सुरू आहे. यामध्ये दुसरं तिसर काय घडलं हे देवालाच माहीत…
पोलिस प्रशासन उत्तर देण्यास तयार नाही आणि राजकीय नेते मुंग गिळून गप्प आहेत किंबहुना कार्यकर्ते बाहेरच्या बाहेर आहेत.
असे जर प्रकार शांततामय शेगाव नगरीत घडत राहिले तर अशांतता नागरी व्हायला वेळ लागणार नाही म्हणून वेळेत लगाम लागलेली बरी तेवढीच ईश्वर चरणी प्रार्थना

या लेखात आम्ही सिगारेट च उल्लेख यासाठी केला की सिगारेट शरीरासाठी घातक आहे आणि ही घटना पाहता यात सिगारेट कोण हे आता तुम्हीच ठरवा.