स्व.विजयदादा देशमुख व लिबर्टी ग्रुप यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय भव्य ओपन मॅरेथॉन स्पर्धा!!

0
753
Google search engine
Google search engine

सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथे स्व.विजयदादा देशमुख व लिबर्टी ग्रुप यांच्या विद्यमाने व युवा नेते धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय भव्य ओपन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथाॅनचे उदघाटन सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सभापती मंदाताई करांडे,जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख ,वसंतराव गायकवाड ,कडेगाव नगरपंचायतीचे भाजपाचे विरोधी गटनेते उदयसिंह देशमुख,धनंजय भैय्या देशमुख,महेश देशमुखे,प्रकाश तडसरे,सुरेश नकाते,विजय गायकवाड,संतोष डांगे श्रीजय देशमुख,सुधाकर चव्हाण, श्रीकांत देसाई,कोतवडे गावचे सरपंच संभाजी यादव,अमर देशमुख,रोहीत देशमुख,संजय देशमुख, कडेगांव तालुका पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष व दै.तरूण भारत चे पत्रकार हिराजी देशमुख,प्रकाश निरंजन व लिबर्टी ग्रुप चे सर्व कार्यकर्ते सभासद उपस्थित होते. ही स्पर्धा स्व सुरेशबाबा चौकातुन सुरू होऊन महालक्ष्मी सुत गिरणी व परत सुरेश बाबा चौकात समाप्त झाली.या स्पर्धेत मुलानमध्ये प्रथम क्र.गणेश काळे,द्वितीय अर्जुन मोहीते,तृतिय आकाश मोरे व चौथा क्र.प्रथमेश जाधव यांनी तर मुली मध्ये प्रथम राखी रजपुत,द्वितीय वर्षा जगताप,तृतिय क्र.अश्विनी होलमुखे यांनी पटकावला या सर्व खेळाडुना युवा नेते धनंजय देशमुख यांचे हस्ते रोख रक्कम,पारीतोषिक,मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले.