सुड बुद्धीने माझ्यावर खोटे आरोप केलेल्यांना जनता माफ करणार नाही ; आमदार ज्ञानराज चौगुले

0
751
Google search engine
Google search engine

स्वताचे अपयश पचवण्यासाठी खोटे आरोप केल्याची प्रतिक्रीया आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सोशल मिडियावर दिली आहे वाचा सविस्तर

सन्माननीय पत्रकार बंधू व सर्वसामान्य नागरिक,

लोकप्रतिनिधी च्या जबाबदारी चे भान असल्याने मी जनतेशी प्रामाणिक !!

नाहक खोटे आरोप करणाऱ्याना जनता माफ करणार नाही !!

मी गेली 25 वर्षे राजकिय क्षेत्रात कार्य करीत आहे दोनवेळा उमरगा नप सदस्य, दुसऱ्यांदा उमरगा लोहारा तालुकाचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहे शांसन स्तरावर ज्या विविध प्रकारच्या योजना आहेत त्याचा माझ्या मतदारसंघात निधी मिळावा म्हणून मी प्रामाणिक पणे प्रयत्न करतो लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या वर ती जबाबदारी आहे आणि त्याचे मला भान आहे पण काही जण स्वतःचे अपयश लपवण्यासाठी राजकीय सूडबुद्धीने नाहक खोटे आरोप माझ्यावर करीत असून त्यांना जनता माफ करणार नाही .

मागील काही दिवसांपूर्वी आदरणीय नगराध्यक्ष ताई यांनी माझ्यावर काही आरोप केले खरं तर त्याला उत्तर मी देणार नाही फक्त मी केलेल्या कामाची माहिती तुम्हाला देत आहे.

मी आताच्या दोन वर्षांच्या काळात आणि मागील शिवसेना सत्तेवर असताना एक रुपया ही निधी उमरगा नप ला दिला नाही असा आरोप आहे. परंतु उमरगा शहरासाठी मी आमदारांचा स्थानिक विकास निधी अंतर्गत उमरगा नदीवर १ सिमेंट बंधारा बांधणे व विविध ठिकाणी ४ विंधन विहिरी घेणे या कामांसाठी सुमारे १५ लक्ष रु. निधी मंजूर करून कामे पूर्ण करून घेतली आहेत.

दुसरा आरोप आहे की , उमरगा शहरातील स्मशानभूमीच्या दुरुस्थीसाठी मंजूर झालेल्या २ कोटी निधी साठी मी श्रेय घेत आहे.

मी आपणास प्रामाणिक पणे निदर्शनास आणून देतो की यासाठी न.प.चे मुख्याधिकारी व अभियंता यांच्याशी चर्चा करून या कामाचा आराखडा तयार करून घेऊन त्यांच्याच समवेत मा.मुख्यमंत्री महोदय व मा.नगरविकास राज्यमंत्री तसेच नगरविकास विभागाचे सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व पत्र देऊन निधीची तरतूद करणेबाबत विनंती केली होती.

एखाद्या कामासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळवावा याचे धडे मला माझे राजकीय गुरु खासदार रवींद्र गायकवाड यांच्या कडून मिळालेले असल्याने मतदारसंघाच्या विविध विकासकामासाठी निधी मिळावा म्हणून मी सुरुवातीपासूनच प्रयत्न केला आहे. याबाबतचे पत्रव्यवहार मी आपणास वेळोवेळी देत आलो आहे.

उमरगा शहरातील स्मशानभूमीच्या विकासकामासाठी माझ्या व्यतिरिक्त इतर सन्माननीय लोकप्रतिनिधिंनी प्रयत्न केले असतील तर मी मतदारसंघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो.

मी आपणास या प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून सांगू इच्चीतो कि मी शिवसेनेची कधीही सत्ता नसलेल्या मुरूम नागरपालिकेसाठी अंतर्गत रस्ते, व विविध ८ ठिकाणी विंधन विहिरी घेणे यासाठी आजतागायत आमदारांचा स्थानिक विकास निधी अंतर्गत सुमारे ४० लक्ष रुपयांचा निधी (उमरगा नगरपालिकेपेक्षाही जास्त ) निधी खर्च केलेला आहे.

खरं म्हणजे उमरगा व मुरुम नगरपालिकेला मी निधी मिळू देत नाही आरोपामुळे मी अस्वस्थ झालो आहे. मी काय आहे हे मतदारसंघातील जनतेला माहीत आहे मला शहर आणि उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांना विनंती करीत आहे की त्यांनी हे आरोप मागे घ्यावेत त्यांनी माझी माफी मागावी असं माझं मत नाही कारण याने मी लहान / मोठा होणार नाही त्यांनी दिलगिरी / माफी जनतेची मागावी कारण हा आरोप जनताच सहन करणार नाही अन्यथा हा आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा मी जनतेची माफी मागायला तयार आहे. किंबहुना राजीनामा देण्यासही तयार आहे.
राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप होतात पण एखाद्याच्या प्रामाणिकपणावर प्रश्न निर्माण करणारे आरोप करू नयेत आणि केले तर ते सिद्ध करावेत. त्या माझा भगिनी आहेत कुणाला तरी खुश करण्यासाठी किंवा मी उमरगा शहरातील स्ट्रीट लाईटची आणलेला निधी परत जावा लागणे, इतर कोट्यावधी रुपयांचा निधी अखर्चित राहणे, उमरगा शहराला आलेले उकिरड्याचे स्वरूप हा त्यांचा नाकर्तेपणा लपविण्यासासाठी त्यांनी हि सारवासारव केली आहे असे मला वाटते. उमरगा शहरातील जनतेमध्ये दोन वर्षात तीव्र नाराजी त्यांच्या कारकिर्दीत निर्माण झाली असल्याचे दिसून येत असून त्यामुळे इतरांच्या सांगितले म्हणून कृपया त्यांनी आरोप करू नयेत.

मी एक शिवसेना चा कार्यकर्ता आहे कालच मा.बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी निमित्ताने मी दर्शन घेऊन आलो आहे त्यांनी अन्याय सहन करू नये अशी शिकवण आम्हाला दिलीय या पुढे असे कुणी ही बिनबुडाचे आरोप केले तर त्यास त्याच पद्धतीने उत्तर देऊ !!

धन्यवाद.

*आपला,*
*ज्ञानराज चौगुले,*
*आमदार, उमरगा-लोहारा*