रासपचे जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांची प्राणी क्लेष प्रतिबंधक व संरक्षण समितीवर निवड

0
770
Google search engine
Google search engine

अकोट/ प्रतीनिधी

रासपचे अकोला जिल्हा अध्यक्ष सतीश हांडे यांची एका आदेशान्वये नुकतीच प्राणी क्लेष प्रतिबंध व संरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राण्यांवर होणाऱ्या बळजबरी तथा त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखणे बाबत सदर समिती कार्य करणार असल्याचे कळते असून या समितीचे अध्यक्ष हे असणार आहेत एकूण 17 सदस्यांची ही समिती असणार आह

सतीश हांडे हे दुग्ध विकास समिती वर देखील अशासकीय सदस्य आहेत ते धनगर आरक्षण मोर्चाचे विदर्भ समन्वयक आहेत. त्यांच्या निवडीमुळे रासपचे कार्यकर्ते तथा धनगर समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे . या नियुक्तीबाबत त्यांना नुकतीच आदेशाची एक प्रत मिळाली असून लवकरच या समितीच्या माध्यमातून ते कार्य सुरू करतील असे प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलताना त्यांनी सांगितले. त्यांच्या या यशाने त्यांच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.