मोर्शी तालुक्यातील लाडकी येथे उन्नत भारत अभियानाचे उदघाटन संपन्न  !

0
2135
Google search engine
Google search engine

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

मोर्शी येथिल भारतीय महाविद्यालय व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक ग्राम लाडकी बु. येथे उन्नत भारत अभियान अंतर्गत उदघाटन समारंभ पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रमेश बिजवे, अध्यक्ष, भारतिय विद्यामंदिर अमरावती, उदघाटक म्हणून डॉ. डी.टी. इंगोले , संचालक, नवोपक्रम , नवसंशोधक, सहचर्य विभाग,स.गा. बा. अ. वि.अमरावती,तर प्रमूख अतिथी व मागदर्शक डॉ.अर्चना बारब्दे , प्रवर्तक, उन्नत भारत अभियान, भारत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत शिगवेकर , डॉ. राजेश बुरगे , भारतीय विद्यामंदिर अमरावती चे उपाध्यक्ष श्री.अनंतराव सोमवंशी , सरचिटणीस डॉ. सतीश कुळकर्णी, सचिव श्री .सलील चिंचमलातपुरे, सदस्य श्री. ऍड. यदुराज मेटकर, माजी प्राचार्य श्री जी. एस. मेश्राम , गावच्या सरपंच सौ.सुनंदाताई भुयार , उपसरपंच डॉ. दिगंबर बुरंगे,सदस्य राजाभाऊ वानखडे , सौ. किरण बरडे, पोलिस पाटील श्री राहुल वडे, ऍड.सुनील वानखडे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बिजवे , श्री , राजाभाऊ पितडी, कार्यक्रम अधीकारी डॉ संदीप राऊत, कार्यक्रम अधीकार डॉ जे. एल. रामटेके, महाविद्यालयातील प्राध्यापक, गावकरी , विध्यार्थी बहुसंख्य उपस्थित होते,

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रामेश बिजवे यांनी मार्गदर्शन करताना शिक्षित भारत – स्वस्थ भारत- स्वच्छ भारत – स्वावलंबी भारत- संपन्न भारत या संकल्पनेतुन साकार झालेली व राष्ट्रीय ग्रामीण विकासाच्या हेतूने राबविल्या जाणाऱ्या” उन्नत भारत अभियान ” या उपक्रमात विद्यापीठअंतर्गत भारतीय महाविद्यालय मोर्शी च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दत्तक घेतलेल्या लाडकी बु. ची निवड होणे ही भारतीय विद्यामंदिर संस्थेसाठी गौरववाची बाब आहे .

उदघाटन पर भाषणात डॉ.डी. टी. इंगोले यांनी या अभियाना अंतर्गत पुढील तीन वर्षात लाडकी बु. गावाचा स्वच्छता , शिक्षण, आरोग्य , रोजगार,कौशल्य विकास, स्वावलंबन, पाणी समस्या वर मात करून, गावाचा सर्वांगीण विकास करावा ही अपेक्षा व्यक्त केली.

तर प्रमुख अतिथी तसेस मार्गदर्शक डॉ . अर्चना बारब्दे यांनी उन्नत भारत अभियान अंतर्गत सुदर व परिपूर्ण गावाची निर्मिती करणे शक्य आहे. त्यानी विविध योजनांची माहिती दिली.

याप्रसंगी डॉ. प्रशांत शिगवेकर , डॉ राजेश बुरंगे श्री राजाभाऊ पितडी , यांनी विचार व्यक्त केले. तसेच गावकरी डॉ. दिगंबर बुरंगे , श्री दिलीप वानखडे , श्री हरिष निशाण यांनी गावातील विविध समस्या ची मांडणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश बिजवे यांनी तर सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप राऊत यांनी केले . आभार प्रदर्शन डॉ जे.एल. रामटेके यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गावकरी मंडळीनी अथक परिश्रम घेतले.