जागतिक मराठी संमेलनात अकोला जिल्ह्यातील दोन सुपुत्र होणार सन्मानित!

0
869
Google search engine
Google search engine

अकोला/संतोष विणके

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने घेण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ या शीर्षकाखालील १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन ४, ५ व ६ जानेवारी २०१९ या दरम्यान नागपूर येथे होणार आहे.

देशातच नव्हे तर जगभरात स्वकर्तृत्वाने मराठीचा झेंडा रोवनाऱ्या आणि प्रेरणादूत ठरलेल्या व्यक्तीमत्त्वांचे एकत्रित मार्गदर्शन व्हावे व यातून मराठी तरुणांमध्ये सकारात्मकतेची बीजं विकसित व्हावीत हा संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. संमेलनाचे मुख्य संयोजक गिरीश गांधी असून अमेरिकेतील उद्योजक श्रीनिवास ठाणेदार हे या संमेलनाचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत.

दि.४ जानेवारीला संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दि.५ जानेवारीला सायंकाळी ५.२५ वाजता ‘भारत विरुद्ध इंडिया’ या विषयावरील परिसंवादामध्ये अकोट येथील शेतकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते ललित बहाळे यांचा सहभाग राहील. आणि ६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता ‘सरहद्द ओलांडताना’ या सदरात अकोल्याच्या प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ.गजानन नारे यांची मुलाखत होणार आहे. जगभरातील मराठी प्रेरणादूतांच्या मांदियाळीमध्ये अकोला जिल्ह्यातील दोन सुपुत्रांच्या प्रेरणादायी कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन डॉ.गजानन नारे व ललित बहाळे यांना सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांचे अकोला जिल्हावासीयांतर्फे सर्व स्थरातून आनंद वक्त होत आहे .